अप्पा ! तुम्हीच कायम माझ्या गुरुस्थानी आहात, धनंजय मुंडे भावूक

dhananjay mundhe and gopinath munde updated

परळी : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त निमित्त त्यांचे पुतणे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात. तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित – उपेक्षित दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळाली, त्यातून या गोरगरीब कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी काम करणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या अप्पा.’ अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

तर, येणाऱ्या काळात या गोरगरीब – कष्टकरी, वंचित – उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले, तर तीच माझी तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली, नव्हे तर गुरुदक्षिणा ठरेल ! विनम्र अभिवादन. अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहते.

दरम्यान, ऊत्तम संघटन कौशल्य, भारदस्त व्यक्तिमत्व, संघर्षयात्रेकरू भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज सहावा स्मृतीदिन… 3 जून 2014 रोजी नवी दिल्लीत रस्ते अपघातात मुंडे यांचा मृत्यू झाला. आज राज्यभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मुंडे यांच्या गावी परळीतही मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केलं जातंय.