धनंजय मुंडेंचा प्रकाश गजभिये यांना पाठींबा

नागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शेतकरी आत्महत्या, शेतमालाला मिळणारा बाजार भाव, आणि राज्यभर मोठ्या प्रमाणावर गाजत असलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.दरम्यान आज आमदार प्रकाश गजभिये यांनी मनोहर भिडे यांच्या आंब्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मनोहर भिडे यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश केल्याने ते चर्चेचा विषय बनले.

दरम्यान मझा आमदार प्रकाश गजभिये यांना पाठींबा असल्याचं विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे. त्यांनी ट्वीट करत प्रकाश गजभिये यांना पाठींबा दिला आहे. विधानपरिषदेतील माझे सहकारी आमदार श्री. प्रकाश गजभिये यांनी आज विधानभवनात श्री. मनोहर भिडे यांनी आंब्यापासून पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्याच वेषात वेषांतर करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी मी त्यांना पाठींबा दिल्याचे मुंडेनी म्हंटल आहे.

You might also like
Comments
Loading...