fbpx

आजच्या दिवशी पंकजाताई आणि प्रितमताईची खूप आठवण येते – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे… एक राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि दुसरे राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते. राज्याच्या राजकारणातील सर्वात जास्त चर्चेत असणारी भाऊ बहिणीची जोडी. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या नेत्यांमध्ये आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक वेगळीच ओढ पाहायला मिळाली.

रक्षाबंधन खरंतर भाऊ बहिणीला एका बंधनात बांधणारा दिवस मात्र या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या भाऊ-बहीण जोडीची चर्चा होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘आजच्या दिवशी मला राजकारणातील माझ्या बहिणीची आठवण आल्याशिवाय निश्चितच राहत नाही’, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राखी बांधण्यासाठी आज त्यांच्या तिघी बहिणी त्यांच्या परळी येथील निवास्थानी आल्या होत्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी ‘आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी मला पंकजाताईनी बांधली आहे आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनीच केली आहे’, अशी आठवण सांगितली.

आमच्या नात्यात राजकारणामुळे दुरावा निर्माण झाला असली तरी नात्यात संवाद असावा अशीच माझी कायम भूमिका राहिली आहे, असेही ते म्हणाले. ‘आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यातली पहिली राखी मला पंकजाताईनी बांधली आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनीच केली’, हे सांगत आजच्या दिवशी पंकजा आणि प्रीतम ताई या दोघींचीही आठवण येतेच असं धनंजय मुंडे म्हणाले. राजकारणात दोन विचार घेऊन चालणाऱ्या या राज्याच्या फायरब्रांड नेत्यांमधील नात्याचा ओलावा अजूनही तसाच आहे अस म्हणायला हरकत नाही.

महत्वाच्या बातम्या 

कार्यकर्त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून धनंजय मुंडेना आठवले आपले पहिले भाषण

बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर टाच

आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनजंय मुंडे

‘धनंजय मुंडेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’