कार्यकर्त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून धनंजय मुंडेना आठवले आपले पहिले भाषण

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका कार्यकर्त्याला त्याच्या पहिल्याच भाषणात रडू कोसळले हे दृश्य पाहिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्या कार्यकर्त्याला धीर दिला. आणि उपस्थितांना आपल्या पहिल्या भाषणाचा अनुभव ऐकवला.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, माजी नगर सेवक शेखर ओव्हाळ यांचे भाषण ऐकून त्यांचे पाहिल्यांदाच भाषण होते यावर विश्वास बसणार नाही. त्यांचे भाषण ऐकून मला माझे सुरुवातीचे भाषण आठवले. 1995 ला मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून सत्कार झाला होता. तेव्हा, माझे पहिले भाषण झाले. दहा मित्रांनी दहा भाषणे लिहून दिली ते वाचले. परंतु, जेव्हा व्यापीठावर गेलो, हातात माईक आला, तेव्हा दहाच्या दहाही भाषणे विसरून गेलो होतो आणि मनाचे बोललो. केवळ आठ मिनिटे बोललो पण पोटात आणि मनातून आलेले बोललो होतो. त्यावेळपासून लागलेली सवय ती 23 वर्षे झाली जात नाही, असेही मुंडे म्हणाले.

Loading...

दरम्यान माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ हे धंनजय मुंडे यांच्या समोर पहिल्यांदाच भाषण करत होते. त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द न फुटता हुंदके आले. भावनिक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले. हे पाहून व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडेंनी त्यांच्या दिशेने पावले टाकत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच पाठीवर थाप देत भाषण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...