सरकारला शेतकऱ्यांचे दुःख या जन्मात तरी कळणार आहे का ? – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला अआहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading...

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. राज्यपाल महोदयांनी आज जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रशासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करायला हवे. राज्यपालांनी कोणत्याही निकषाची अट न घालता, सरकारचे नेहमीचे धोरण बाजूला ठेवत शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

दिलेल्या तुटपुंज्या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. सरकारला शेतकऱ्यांचे दुःख या जन्मात तरी कळणार आहे का ? अशी घणाघाती टीका मुंडे यांनी केली आहे. तर प्रशासनाने कर्जवसूलीस स्थगिती देऊन कर्जमाफी करावी. परीक्षा शुक्ल नव्हे तर संपूर्ण फी माफ करावी. विजेचे बिल माफ करावे तसेच रब्बीची उचल देण्यासाठी तरतूद करावी अशी आमची मागणी आहे. अस धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मराठवाड्यातील तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई मदतरूपात देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज पडणार आहे. पिकांचे पंचनामे करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती मदत करावी लागेल, याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सादर केला आहे. पीकस्थितीचे नुकसान लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी बांधावर भेटी सुरू करताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. यानंतरच पंचनाम्याला देखील गती आली.

यंदाच्या खरिपात ५० लाख २० हजार ५९१.६६ हेक्टरवर खरिपाची प्रत्यक्ष पेरणी झाली होती. या क्षेत्रापैकी ४० लाख ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायत, तर ३२ हजार हेक्टरवरील फळपिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या नियमांच्या अधीन राहून २९०४ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या 







Loading…










Loading…

Loading...