fbpx

बोंडअळी आणि धानासंदर्भात धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव…

dhanjay mundhe

नागपूर  – बोंडअळीमुळे कापसाचे आणि तुडतुडयांमुळे धानाच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सभागृह चालू असताना मंत्री बाहेर घोषणा कशा करतात अशी विचारणा करतानाच शेतक-यांची फसवणूक करताना सरकारला लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल केला आणि मुख्यमंत्र्यांनी खोटे बोलल्याबाबत आणि फसवणूक केल्याबाबत सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

या विषयावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावर सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं- धनंजय मुंडे

2 Comments

Click here to post a comment