जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट दूर व्हावे म्हणून धनंजय मुंडेंनी वैद्यनाथाला घातले साकडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील बहुतांशी भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह कोकणातील अनेक ठिकाणी सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. अशातच मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अद्याप बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संपुर्ण बीड जिल्ह्यात भरपुर पाऊस पडुन दुष्काळाचे सावट आणि पाणी टंचाईचे संकट दुर व्हावे, यासाठी प्रभु वैद्यनाथाला साकडे घातले. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त त्यांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेऊन राज्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी प्रार्थना केली.

प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट आणि पाणी टंचाईचे संकट दुर व्हावे यासाठी आज आपण प्रभु वैद्यनाथाला प्रार्थना केली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत युवक नेते अजय मुंडे, लक्ष्मणराव पौळ, गोविंद फड, राजाभाऊ पौळ व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने धनंजय मुंडेंचा सत्कारही करण्यात आला.

दरम्यान पुणे जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आज देखील (6 ऑगस्ट, मंगळवार ) जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

भाजप-सेनेच्या युतीमुळे बीडमधून राष्ट्रावादी हद्दपार होण्याच्या मार्गावर

भाजप राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडा : अमित देशमुख