…जेव्हा क्रिकेटच्या मैदानात धनंजय मुंडे नावाचं वादळ येतं.

dhanjay mundhe playing cricket

परळी :आपल्या आक्रमक, अभ्यासपूर्ण भाषणशैलीमुळे सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे याच आज एक वेगळं रूप पहायला मिळालं. एरव्ही आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी करणारे धनंजय मुंडे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडताना पहायला मिळाले . फक्त राजकारणातच नव्हे तर मैदानात देखील आपणच सबसे बडा खिलाडी असल्याचं दाखवून दिलं.

 dhananjay munde cri 1

Loading...

शेतकऱ्यांच्या , सर्वसामान्यांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे नेहमीच आक्रमकपणे जनतेची बाजू मांडत असतात.त्यांच्या याच आक्रमक राजकारणाच्या याच स्टाईलमुळे ते महाराष्ट्रभर ओळखले जातात आणि हे सर्वच जण जाणतात. मात्र मुंडे हे उत्तम फलंदाज देखील आहेत हे खूप थोड्या लोकांना माहित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून सरपंच चषक या दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन , वाव मिळावा यासाठी परळीत सुरु असलेल्या या टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेत ( सरपंच चषक ) संयोजक आणि खेळाडूंच्या आग्रहास्तव मुंडे सहभागी झाले .

dhananjay munde cri3

धनंजय मुंडे यांनी परळी येथील नगरसेवक 11 विरुद्ध जिल्हा परिषद सदस्य 11 या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली एवढंच नव्हे तर संघाला विजय मिळवून देत नाबाद राहिले. शालेय जीवनापासूनच क्रिकेटची विशेष आवड असलेल्या मुंडे यांनी यापूर्वीपण ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. तसेच अनेकवेळा एका संघाच्या माध्यमातून यशस्वी फलंदाजीसुद्धा केलेली आहे.यानिमित्ताने नेहमी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चौफेर फटकेबाजी करणारे धनंजय मुंडे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना दिसले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ