धनंजय मुंडे का प्रकाश सोळुंके? कोणाला मिळणार मंत्रीपद?

टीम महाराष्ट्र देशा : भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अन्य लोकांनी ही मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे, प्रकाश सोळुंके त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यासाठी धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर असून, ज्येष्ठत्वाच्या मुद्द्याने प्रकाश सोळंकेही आशावादी आहेत. संदीप क्षीरसागर यांनीही पवार कुटुंबीयांची मर्जी संपादन केल्याने त्यांनाही चांगली संधी मिळण्याची आशा आहे. राज्यात नाही भेटली तरी मिनी मंत्रालयात त्यांच्या आईला ही संधी दिली जाईल, असा अंदाज आहे.

मागच्या निवडणुकीत चांगलाच पाडाव झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला यावेळी जिल्ह्यात अच्छे दिन आले. सहापैकी चार जागा जिंकत राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली. पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे अशा दिग्गजांचा पराभव करण्याची किमया अनुक्रमे धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे यांनी साधली.

दरम्यान, भाजप – सेना युती तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अशी मोट बांधण्यात शरद पवार यशस्वी झाले. प्रतिकूल परिस्थितीतही पवार यांच्या राजकीय कौशल्याने राज्यात वेगळे चित्र निर्माण होत असतानाच अचानक देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकारणात मोठे ट्विस्ट तर निर्माण झालेच. परंतु पवारांच्या घरात बंडखोरीमुळे याची अधिकच चर्चा झाली.

मात्र, या आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील नेत्यालाच बीडचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. त्यात धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, खप्पामर्जीमुळे कदाचित मनाजोगे खाते मिळेलच अशी शाश्वती राहिलेली नाही. तर, चौथ्यांदा आमदार आणि यापूर्वीचा मंत्रिपदाचा अनुभव म्हणून प्रकाश सोळंकेदेखील मंत्रिपदासाठी आशावादी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Loading...