fbpx

‘मी चेकमेट झालेलो नाही, अभी तो खेल शुरु हुआ है’ : धनंजय मुंडे

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा- मी चेकमेट झालेलो नाही, अभी तो खेल शुरु हुआ है.खरा दे धक्का काय असतो ते 24 तारखेला म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालालाच कळेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, लातूर-उस्मानाबाद-बीड या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.

रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली आहे. काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी धुमधडाक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देखील दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुरेश धस यांना उमदेवारी मिळाली होती. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून विधानपरिषदेचं तिकीटही दिले होते. मात्र आता कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे वांदे झाले आहेत.

अभी तो खेल शुरु हुआ है- धनंजय मुंडे
”भाजपने उमेदवारी न दिल्याने रमेश कराड नाराज होते. त्यांना आम्ही पक्षात घेतलं, उमेदवारीही दिली. त्याबद्दल त्यांनी कृतघ्नता व्यक्त करायला हवी. मी चेकमेट झालेलो नाही, अभी तो खेल शुरु हुआ है,” असंही धनंजय मुंडे म्हणाले.