fbpx

गडावर मुंडे साहेबांचे भाषण झालं आणि पाथर्डीत मला ‘खलनायक’चा संजय दत्त ठरवलं होत – धनंजय मुंडे

dhananjay mundhe and gopinath munde updated

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची सुरु असलेली निर्धार परिवर्तन यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात होती त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पाच वर्षापूर्वीची एक आठवण सांगत खंत व्यक्त केली.

‘गोपीनाथराव मुंडे साहेब पाथर्डीला मावशी म्हणायचे. मुंडे साहेब आणि माझ्या नात्यानुसार ही पाथर्डी माझी आजी आहे. मुंडे साहेबांनी जेवढा जीव या पाथर्डीला लावला त्याहून तसूभरही प्रेम कमी पडू देणार नाही. अस सांगत धनंजय मुंडे यांनी पाच वर्षापूर्वी आपल्याला याच पाथर्डीत खलनायकचा संजय दत्त ठरवल होत’ अशी आठवण देखील सांगितली.

धनंजय मुंडे म्हणाले “पाथर्डीत आले की कुठल्या विषयवार बोलाव, पाच वर्षापूर्वी भगवान गडावर स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचे एक भाषण झाले आणि त्या भाषणानंतर हाच धनंजय मुंडे या भागात खलनायक चित्रपटाचा संजय दत्त झाला होता. मात्र आज याच पाथर्डीमध्ये माझ एवढ मोठ स्वागत होत आहे. कारण राष्ट्रवादीने मला माझ कर्तुत्व दाखवण्याची संधी दिली.”

तर ‘मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्या ड्रायव्हरला शिक्षा झाली का? मुंडे साहेबांचा राजकीय वारस सांगणाऱ्यांनी देखील या अपघातावर सुरवातीला संशय व्यक्त केला होता. आता त्या संशयाचे काय झाले’,असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.