असा नेता पुन्हा होणे नाही – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातल्या एका महान पर्वाचा अस्त झाला आहे. देशाचं लाडकं, सर्वमान्य नेतृत्वं आपण गमावलं आहे. ते राजकारणातील आदर्शपुरुष होते. त्यांच्यासारखा सर्वमान्य नेता पुन्हा होणे नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अश्या शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष धनंजय मुंडे यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास झळकणार मोठ्या पडद्यावर

You might also like
Comments
Loading...