न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपल्या बदनामीचा प्रयत्न – धनंजय मुंडे

0Dhananjay_Munde_0

परळी – संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या कर्जाच्या संदर्भात मा. अंबाजोगाई न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मा. अंबाजोगाई न्यायालयाने दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सहकारी सुतगिरणीच्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करा असे कोठेही म्हटलेले नाही तर सुतगिरणीच्या सर्व संचालकांची अर्जात नमूद केलेली प्रॉपर्टी विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच हा निकाल अंतिम नसून अंतरिम आहे या संबंधी आम्हाला हजर लावून म्हणणे सादर करून आधी नोटीस प्राप्त व्हायला हवी होती, सदर नोटीस प्राप्त झालेली नाही, सदर नोटीस प्राप्त होताच आम्ही न्यायालयात हजर राहून हा आदेश रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा देत राहु असे ना. मुंडे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

Loading...

आपण वर सांगितलेली वस्तुस्थिती खरी असताना आपले नेहमीचे विरोधक न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माध्यमांनी कृपया त्यांनी दिलेल्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची माहिती घेऊन बातम्या द्याव्यात असे आवाहनही श्री. मुंडे यांनी केले आहे.सुतगिरणीच्या खटल्यात 17 संचालक आहेत, 17 संचालकांपैकी मी एक संचालक आहे. आजपर्यंत या प्रकरणात, तपासात संपुर्ण सहकार्य केलेले असून यापुढेही कायदेशीर मार्गाने आपला लढा सुरूच राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.

डी. सी. सी. बँक ज्यांनी बुडवली आणि चार वर्ष कारावासही भोगला ते महारथी भाजपाचेच कार्यकर्ते, नेते आहेत, आणि आजही ते पालकमंत्र्यांसोबत जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात. हे संपुर्ण जिल्ह्याला माहित असताना न्यायालयीन निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपली बदनामी करणाऱ्यांचा  हा प्रकार म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे ‘ असा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी