सेना-भाजप सरकारचे ढोल बडवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

परिवर्तन होणारच धनंजय मुंडे यांचा दृढविश्वास

रायगड : हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत नसून आम्ही आता भाजप सरकारचा ढोल बडवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

आजपासून भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा सुरू होत आहे. त रायगडावर शिवाजी महाराजांना अभिवादन करून या यात्रेचा प्रारंभ राष्ट्रवादीने केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी तिथे असलेल्या ढोल पथकातील एक ढोल वाजवत सरकारवर हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हटलं आहे ?

हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत नाही. आज शेतकरी हवालदिल झाला आहे, तो आत्महत्या करतोय, दलित-अल्पसंख्याक समाज दुखावला गेला आहे. धनगर समाजाला आरक्षण दिले गेले नाही, मुस्लिम समाज आजही हक्कांसाठी झगडतोय, महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढला आहे. मात्र भाजप-शिवसेना युतीचा ढोल बडवत आहे. येत्या निवडणुकीत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही यांचा ढोल बडवल्याशिवाय राहणार नाही. परिवर्तन होणारच.

You might also like
Comments
Loading...