उद्या हे गुटखा माफिया खून करायलाही मागे पडणार नाहीत – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गुटखा बंदी असली तरी खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

गुटख्याची गाडी सोडावी यासाठी पोलीस अधिका-याला धमकावले जाते याचाच अर्थ राज्यात बंदी असतांनाही खुलेआम गुटख्याची विक्री, उत्पादन केले जात आहे. मी या विषयावर सातत्याने आवाज उठवत आहे मात्र सरकार कारवाई करीत नसल्यानेच पोलिसांना धमकी देण्यापर्यंत या माफियांची मजल गेली आहे.

तर गुटखा बंदीबाबत मी मार्च अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तेंव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचारी यांना धमकी देण्यातआली.आता गुटखा गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत उद्या हे गुटखा माफिया खून करायलाही मागे पडणार नाहीत. अस ट्विट धनंजय मुंडे यांनी याच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.

You might also like
Comments
Loading...