धनंजय मुंडेंनी कारखान्याच्या जमिनी लुबाडल्या, पंकजा मुंडेंचा आरोप

dhananjay mundhe and pankaja munde 2

टीम महाराष्ट्र देशा: धनंजय मुंडे यांनी कारखान्याच्या नावाने जमिनी लुबाडल्या आहेत, मयत व्यक्तींच्या जमीन देखील जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतल्याने त्यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीडमध्ये आयोजित सभेत पंकजा बोलत होत्या.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस बजावण्यात आली, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. अण्णांनी हाडाची काडे करून वैद्यनाथ कारखान्याची उभारणी करून वैभव प्राप्त करून दिले. त्याच कारखान्याचे वैभव स्व. मुंडे साहेबांच्या वारसांना जपता आले नसल्याची टीका धंनजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्याच्या याच टीकेचा समाचार घेताना पंकजा यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मी वयक्तिक कोणावरही टीका करत नाही, परंतु आमच्या बांधून ती सवय आहे वैद्यनाथ कारखाना आधी यांच्याकडेच होता. त्यांच्यामुळे तो अडचणीत आहे. आत्ता मी सत्तर टक्के लोकांचे पैसे दिले आहेत. एकाही शेतकऱ्यांचा रुपया ठेवणार नाही. वेळ पडल्यास स्वतःचे पैसे, जमीन गहाण ठेवेन आणि शेतकऱ्यांना पैसे देईन.’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या .