बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या मुलीने दिल्या शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मतदानापूर्वी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. तसेच मुंडे यांच्या मुलीने त्यांना ऑल द बेस्ट म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

यावेळी मुंडे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘नेहमी माझ्या बाळाला परीक्षेसाठी मी ऑल द बेस्ट देत असतो. आज माझ्या लेकीने या बाबाला ऑल द बेस्ट दिलंय. Thank you आदीश्री! असे मुंडे यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, मुंडे कालपासून चांगलेच चर्चत आहेत. विरोधी उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या कथीत आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. महिला आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या