‘विधानसभेचा निकाल लागल्यावर कोणालाही तीन पक्षांचे सरकार येईल, असे वाटले नसेल पण …’

मुंबई : राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर चांगलीच स्तुतिसुमने उधळली आहेत.

विधानसभेचा निकाल लागल्यावर कोणालाही हे तीन पक्षांचे सराकर येईल, असे वाटले नसेल पण हे काम आदरणीय पवार साहेबांनी साध्य केले. त्यात सरकार आल्यावर सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतला व त्याची जबाबदारी माझ्यावर दिली, याबद्दल साहेबांचे आभार, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Loading...

ते पुढे म्हणाले की, या विभागातून नेमके किती आणि काय काम करू शकतो याचा अंदाज मागील १५ दिवसात आला आहे. राज्यातील २२.५% लोकांशी थेट संबंध येतोय हे माझे भाग्य आहे. हे फार मोठं आव्हान आहे आणि यासाठी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले,आपल्या नेतृत्वाची दूरदृष्टी किती आहे ते पहा. जसा काळ बदलतो तसे निर्णय घेण्याची गरज असते. यासाठी पवार साहेबांनी आदेश दिले आहेत की इथून पुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल तसेच राज्यात अशी नावे असलेल्या वस्ती असल्यास ती नावे बदलून योग्य नावे देण्याचे काम पूर्ण होईल. वंचितातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी अनेक बदल करण्याची गरज आहे. यातून काही घटकांची मनं दुखावली जातील पण हे बदल होणे गरजेचे आहेत. पण ते होणारच, अशी खात्री मुंडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, २०२१ साली १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती ही इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकापुढे साजरी केली जाईल याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे हे माझे थोर भाग्य आहे, असेही ते म्हणाले.

याच बैठकीत बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयदेव गायकवाड यांनी देखील पवारांचे कौतुक केले. आज आंबेडकरी विचाराचे खरे वंशज पवार साहेब आहेत. त्यांना दलित समाजाचा खरा कळवळा आहे. त्यांच्याच विचारांवर पाऊल ठेवून आपल्याला वाटचाल करायची आहे, असे आवाहन गायकवाड यांनी उपस्थितांना केले.

गायकवाड पुढे बोलताना म्हणाले,लोकशाहीची लढाई झाली आणि त्यात आपण परिवर्तन करून दाखवले. याबद्दल आदरणीय पवार साहेबांचे अभिनंदन करतो की त्यांनी राज्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे सरकार स्थापन करण्याचे काम केले. राज्यात एक सामाजिक संतुलन निर्माण करण्याकरता आपण ठोस पावले उचलत आहोत याचे समाधान वाटते.

खा. पवार साहेबांनी विकास यादीत पाचव्या क्रमांकावर असलेले इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे नाव पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केले आहे. यातून सर्व दलित समाजाला आनंद देण्याचे काम त्यांनी केले आहे. आज आपण गावांच्या रचनेत फेरबदल करण्याची गरज आहे. गावागावात असलेल्या अदृश्य भिंती तोडण्याचे काम आपण करण्याची गरज आहे. जातीवाचक नावे घेणे बंद करण्याची गरज आहे असं ते म्हणाले.

यावेळी पवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.केंद्र सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही, असे मत खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण, आज मराठा समाजात जन्मल्याची लाज वाटते : तृप्ती देसाई
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
संज्याला मी चर्च गेट स्टेशनवर फाटक्या कपड्यात पेटी वाजवताना बघितलं होतं ; आज खात्री झाली : निलेश राणे
कोरोना इफेक्ट् : भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं