गोंधळी समाजाचा सभागृहासाठी धनंजय मुंडेंकडून १० लक्ष रुपयांचा निधी

dhananjay munde

परळी : परळी शहरातील गोंधळी समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.

परळी शहरातील गोंधळी समाज बांधवांची त्यांच्या समाजासाठी स्वतंत्र सामाजिक सभागृह असावे अशी अनेक दिवसांची मागणी केली. समाजबांधवांनी याबाबत मुंडे यांच्याकडे याबाबत मागणी करताच त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दहा लक्ष रुपयांच्या निधीचे पत्र समाजातील प्रतिष्ठित मंडळींकडे सुपूर्त केले.

शहरातील बसवेश्वर कॉलनी भागात हे सुसज्ज असे सभागृह बांधण्यात येणार असून त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या ठिकाणी समाजाचे विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, बैठका, वार्षिक उत्सव संपन्न होणार आहेत.