जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : परळीतील प्रचारसभेत पंकजा मुंडेबाबत आक्षेपार्ह वक्तव्याची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेना दिलासा देणारे वृत्त राजधानी दिल्लीतून आलं आहे. बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार म्हणजेच जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणाची सुनावणी पुढील दोन आठवड्यांनी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे मुंडेना पुढील दोन आठवड्यांसाठी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या आदेशावर स्थगिती आणली होती. तसेच औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी २१ ऑक्टोबर म्हणजे आज होणार होती. मात्र आता ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे.

सध्या धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या तिकीटावर परळी मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. त्यांची बहीण आणि भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यामुळे राजकीय भावितव्यासोबतच जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा आरोपातही त्यांचा निकाल येण्याची चिन्हं होती.

महत्त्वाच्या बातम्या :