मोदींना शहीद जवानांच्या नावे मतं मागताना लाज वाटत नाही का?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशात प्रचार सभा आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नुकतेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटर वर मोदींवर निशाणा साधत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मोदींवर कडाडून टीका केली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे ?

मोदींना शहीद जवानांच्या नावे मतं मागताना लाज वाटत नाही का? जवानांच्या कर्तृत्वाचे, धैर्याचे, बलिदानाचे असे राजकीय भांडवल करणारा पंतप्रधान मी याआधी कधीच पाहिला नाही. तुमच्या ५६ इंची छातीत दम असेल तर तुम्ही केलेल्या कामावर मतं मागा, शहीद जवानांच्या आणि टीकेच्या कुबड्या घेऊन नाही. अशा आशयाच ट्वीट करून त्यांनी मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.