शिवसेना आता भीवसेना झाली; मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम- धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

पाटण: धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत. असे धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.

राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने सत्ताधारी भाजप शिवसेनेवर हल्ला चढवत आहेत. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली.