गड, मंदिरांवर फक्त घोषणा, कामाचा पत्ताच नाही; भाजप सरकारच्या कामाच्या पद्धतीवर धनंजय मुंडेंनी ओढले ताशेरे

dhanjay mundhe

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत पुढील वर्षीच्या ३४४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयांची माहिती दिली यावेळी बीडचे आमदार क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे उपस्थित होते. मागील सरकारमध्ये झालेल्या कारभारावर ताशेरे ओढताना भाजपच्याच आमदारांच्या तोंडून प्रि-फॅब्रिकेटेड अंगणवाड्याचा जवळपास २४ कोटी आखर्चित निधी परत गेला असल्याचे बैठकीत उघड झाल्याचे मुंडे म्हणाले.

Loading...

तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील सरकारच्या कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले म्हणाले, ‘गड, मंदिरांसाठी फक्त निधी घोषित झाला, कामाचा पत्ताच नाही. तत्कालीन पालकमंत्री (पंकजा मुंडे) यांच्या काळात हा प्रकार इतका सहज का घेतला गेला, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगड, श्रीक्षेत्र गहिनीनाथगड, ज्योतिर्लिंग वैद्यनाथ आदी ठिकाणी नुसते भूमिपूजन झाले. विकासकामांचा अद्याप पत्ता नाही, ना घोषित केलेला निधी मिळाला,’ असा आरोप पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, की तत्कालीन पालकमंत्र्यांना मागच्या नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर निधीपैकी फक्त 40 टक्के निधी खर्च करता आला आहे. भविष्यात हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देखील मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात