दीड रुपयाच्या मुखपत्रात हिमालयाची उंची दिसणार नाही, धनंजय मुंडेचा शिवसेनाला टोला

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला गळती लागली आहे. पक्षाचे जुने जाणते नेते देखील साथ सोडत आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांना धीर देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, असा सल्ला दिला होता. पवार यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून निशाना साधण्यात आला आहे. जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते?’ असा प्रश्न शिवसेनेने शरद पवारांना विचारला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तोडीसतोड प्रत्युत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून शिवसेनेच्या मुखपत्राला म्हणजे ‘सामना’ दैनिकला लक्ष्य केले आहे. आदरणीय शरद पवार साहेब हे हिमालय आहेत. दीड रुपयाचे मुखपत्र, त्यांच्या दीडदमदीच्या मालकांच्या दृष्टीक्षेपात हिमालयाची उंची येणार नाही. साहेबांनी ५० वर्षे अविरत महाराष्ट्राची सेवा केली. सच्चे मावळे तयार केले. तुमच्यासारखी अफजलखानाच्या शामियान्यात जावून राज्याशी फितूरी केली नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

Loading...

दरम्यान पवार हे अचानक शिवसैनिकांची भाषा बोलू लागले आहेत. ही गंमतीची गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची गुंडगिरी मोडून काढण्याची भाषा ते करीत. गुंडगिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही असे ते बोलत, पण शिवसैनिकांनी संकटकाळी जी भाषा वापरली तीच भाषा वापरून पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम पवार करीत आहेत, असा टोला ‘सामना’ अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ