‘शेतकरी, बेरोजगारांना देशोधडीला लावण्याचे महापाप, भाजप-शिवसेनेच्या सरकारनं केलयं’

टीम महाराष्ट्र देशा:- गेल्या पाच वर्षात राज्यातील तरुणांना बेरोजगार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे महापाप भाजप-शिवसेनेच्या सरकारने केले आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे .

बदनापूर विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार बबलू उर्फ रुपकुमार चौधरी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.15) अंबड शहरातील महावीर चौकात आयोजित सभेत ते बोलत होते . यावेळी घनसावंगी विधानसभेचे उमेदवार राजेश टोपे उपस्थिती होती.

धनंजय मुंडे म्हणाले की , युतीचे सरकार हे फसवे आहे 

मेगाभरतीचे काय झाले? उद्योग धंदे बंद पडले. लाखो बेरोजगार झाले .राज्यातला स्वाभिमान कोठे आहे, तरुणांच्या बाबतीत आज नोकरी नाही, तर छोकरी नाही. अशी अवस्था होऊन बसली आहे.
शरद पवार यांना राज्यातील तरुणांच्या भविष्याची दिवसरात्र चिंता आहे.यामुळे विकासाचा ध्यास व सर्वसामान्य जनतेच्या हिताची रक्षण करणारा जाणता राजा शरद पवार यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे .असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...