fbpx

‘बेजबाबदार राज्यसरकार अन् निर्लजम सदासुखी महापालिका’

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईकरांना आज अजून एक धक्का बसला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी डोंगरी दुर्घटनेमध्ये सरकारला जबाबदार धरल आहे.

डोंगरी दुर्घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी घटना स्थळी धाव घेतली. यावेळी धनंजय मुंडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही. पुनर्विकासाच्या इमारतींबाबत सरकारचे धोरण हे उदासीन आहे. पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच अशा इमारत दुर्घटना होत आहेत. राज्य सरकारचे पुनर्विकासाचे उदासीन धोरण, म्हाडा आणि मुंबई महापालिका दुर्घटनेला जबाबदार आहे.

दरम्यान दिवसेंदिवस मुंबई ही धोकादायक होत आहे. त्यामुळे सामन्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन मुंबईत वावरत आहे. डोंगरीमध्ये झालेली दुर्घटना ही मुंबईकरांसाठी मोठा धक्का आहे. डोंगरीतील बाबा गल्लीत चार मजली इमारत होती. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. यात ४० ते ५० जन अडकल्याची शक्यता आहे. तर 5 जणांना आपला जीव गमवावा लागल आहे. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.