‘असते एक-एकाचे नशीब… कधी डक वर्थ लुईस मदतीला येतो तर कधी ईव्हीएम’

dhananjay munde and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. तसेच अनेक नेते एकमेकांवर टीकाही करताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे महाजनादेश रॅलीला संबोधित करताना विरोधकांच्या ईव्हीएम रॅलीचा खरपूस समाचार घेतला. सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात २१ तारखेला रॅली काढण्याचे जाहीर केले. या विरोधी पक्षांची अवस्था वर्ल्डकपच्या हारलेल्या टीमसारखी आहे. अस फडणवीस म्हणाले होते.

dhananjay munde vr cm

यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री महोदय, तुम्ही बरोबर म्हणालात की विरोधक हे न्यूझीलंडच्या संघासारखे आहेत. कारण त्यांनी उत्कृष्ट खेळ करत करोडोच्या मनात विजेता हेच स्थान मिळवले आहे. आमचे ही असेच आहे. असते एक-एकाचे नशीब… कधी डक वर्थ लुईस मदतीला येतो तर कधी #EVM मशीन’ अस ट्वीट केले आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना जनआशीर्वाद यात्रा तर भाजप महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीनेही शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.

आम्ही भाजपची बी टीम कसे ? खुलासा करा मग आघाडीची चर्चा करू

धनंजय मुंडेंची मोर्चेबांधणीला सुरुवात ; पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या मैदानात

मी जनतेचा जनादेश घ्यायला आणि हिशेब द्यायला यात्रेवर निघालोय : देवेंद्र फडणवीस