fbpx

कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपने केला लोकशाहीचा खून : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : कानडी नाट्याच्या दुसऱ्या अंकाला सुरवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘काँग्रेस नेते डी.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून जीवाला धोका असल्याचं पत्र कर्नाटकच्या आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाला नवीन वळण लागले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लक्ष केले आहे.

कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजप लोकशाहीचा खून करत आहे. भाजपने कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत डांबून ठेवले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे पदाधिकारीही खतपाणी घालत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही आमदारांना भेटू दिले जात नाही. हा घोडेबाजार लोकशाहीला धरून नाही.

दरम्यान कर्नाटकातील राजकीय नाटयाचा खेळ आता मुंबईत सुरु झाला आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,’ असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. शिवकुमार आणि कुमारस्वामींना भेटण्याची इच्छा नाही’ असंही बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सध्या सगळे 10 आमदार रेनिसान्स हॉटेलमध्ये असून कडक सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आलं आहे.