पाणी टंचाईसाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित कार्यक्रमात सत्ताधारी भाजपवर पुन्हा एकदा टीका केली आहे. या दुष्काळात परळीकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता त्यावरून मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Loading...

यावेळी बोलताना त्यांनी ‘शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण कोरडे पडल्याने पाणी टंचाई जाणवत असली तरी नगर परिषदेने शर्थीचे प्रयत्न करून शहराला पाणी टंचाई जाणवु दिली नाही. नाथ प्रतिष्ठानचे तसेच अनेक नगरसेवकांचे स्वतःच्या टँकरद्वारे आम्ही पाणी पुरवठा केला. नगर परिषदेला प्रतिष्ठानने १५ लाख रूपयांची मदत केली. मात्र सत्ताधारी असणार्‍या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी परळीच्या पाण्यासाठी पाणी वाटपाचा शो करण्याशिवाय दुसरे काय केले. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...