‘भाजपने काहीही करू दे, या शाहु फुले आंबेडकरी जनता सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही’

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : भाजपवाले कितीही नीच पातळीवर भ्रष्टाचार करु देत परंतु या शाहु फुले आंबेडकरांच्या विचारातील महाराष्ट्रातील जनता यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. आज जिंतूर येथे शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा पार पडली. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडेनी भाजप सरकारवर चांगलीचं टीका केली. तर जनता जनार्दन असते असे म्हणत भाजपवाले कितीही नीच पातळीवर भ्रष्टाचार करु देत परंतु या शाहु फुले आंबेडकरांच्या विचारातील महाराष्ट्रातील जनता यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा जनतेप्रती विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

तर पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजप महाराष्ट्रात जिंकू शकत नाही हा आत्मविश्वास नाही म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते फोडत आहेत असा आरोपही मुंडे यांनी केला.आज दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती मराठवाड्यात आहे मात्र हे कृत्रिम पाऊस पाडायला निघाले आहेत. याच्या फवारणीने आलेले ढगच गायब झाले आहेत असे हे देवेंद्राचे सरकार असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा देखील काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप सरकारला चांगलेचं धारेवर धरले आहे. तर जनतेमध्ये ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा’ हे बीज रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.