भाजप-सेनेचे हे दळभद्री सरकार उलथून टाकायचे आहे – धनंजय मुंडे

Devendra fadnavis vs munde vs uddhav

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजप आणि शिवसेनेनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्राही सुरु आहे.

शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर-खेड येथे पार पडली यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजप सेनेचे हे दळभद्री सरकार उलथून टाकायचे आहे आणि रयतेचे राज्य आणण्याचा निश्चय करुया असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच जनतेसाठी काय करणार हे सांगत नाही उलट येणाऱ्या निवडणूकीत आमचा मुख्यमंत्री, मीच मुख्यमंत्री असणार आहे यासाठी या यात्रा आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

तसेच पुढे बोलताना दोन्ही यात्रा ज्या पक्षांनी काढल्या त्यांना जनतेचं दु:ख यांना दिसत नाही. तो फक्त दिसतो तो राष्ट्रवादी काँग्रेसला. जनतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरुन सरकारला सळो की पळो करून सोडले आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभच आता बोलू लागलाय की भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. कितीही पापी माणूस तिथे गेला तरी शुद्ध होतो अशी उपहासात्मक टीका धनंजय मुंडे यांनी केली.

दरम्यान, या सभेत अजित पवार यांनी ‘आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल सरकारला केला.

कलम ३७० बाबत आज भारताने काश्मीरला दगा दिला : फारुख अब्दुल्ला

‘नाच्या’चं काम सोडून पाण्याचं बघा; अजित पवारांचा गिरीश महाजनांना सल्ला

शिवस्वराज्य यात्रा : पुढचा मुख्यमंत्री आघाडीचाचं – अमोल कोल्हे

बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं, अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल