#पक्षांतर : हा तर राजकीय भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

0Dhananjay_Munde_0

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याविषयी धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे.

धनंजय मुंडे यांनी ‘राष्ट्रवादीला गळती लागली आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र हा राजकीय भ्रष्टाचार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर तो सत्तेचा गैरवापर आहे अस विधान केले आहे. तसेच २०१४ च्या निवडणुकीआधीही निवडून आलेले अनेक आमदार पक्ष सोडून गेलेले आहेत आणि ते गेल्याने राष्ट्रवादी पक्ष संपणार नाही, असही मुंडे म्हणाले.

भाजपचे शतप्रतिशत यश हेच आहे का? दुसऱ्या पक्ष्याचे आमदार किंवा इतर पदाधिकारी फोडणे याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी स्वतःला जे शत प्रतिशत समजते हे साफ खोटे आहे, असं मुंडे म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी आजपर्यंत असं राजकारण कुठल्याही राजकीय पक्षाने केले नव्हते. ते राजकारण आज भाजप-शिवसेना करत आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही, असेही मुंडे म्हणाले