अखेर हुकूमशाहीचा उदय झालाच, आम्हाला जी भीती होती ती सत्यात उतरत आहे : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरलं असून, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना अपयश आले आहे त्यावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून भाजपवर टीका केली आहे.

त्यांनी ‘अखेर हुकूमशाहीचा उदय झालाच! साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करत भाजपने कर्नाटकातले सरकार पाडलेच. बहुमताच्या जोरावर आता कोणतेही निर्णय घेतले जात आहे. आम्हाला जी भीती होती ती आता सत्यात उतरत आहे’ अशा आशयाच ट्वीट करत भाजपवर निशाना साधला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी जे लोक या आघाडीच्या सत्तेला एक धोका आणि अडथळ्याच्या रुपात पाहत होते, त्यांच्या लालसेचा आज विजय झाला. हा लोकशाही, प्रामाणिकपणा आणि कर्नाटकच्या जनतेचा पराभव आहे. अशा आशयाच ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे.