‘मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन’ धनंजय मुंडेंनी उडवली मोदींची खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा : केदारनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेत ध्यानसाधना सुद्धा केली. त्यांच्या या ध्यानसाधनेची राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली आहे.

मैं, मेरी तन्हाई (और कॅमेरामन)… ज्ञानसाधनाही इतक्या थाटामाटात करतात हे मोदी साहेबांमुळे जगाला कळलं असणार. निवडणुकींच्या निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना! या आशयाचे ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आहे.

दरम्यान, केदारनाथ येथील गुहेत आज रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत. ध्यानधारणा करताना सुद्धा नरेंद्र मोदींना कॅमेरामन कशाला बरोबर लागतो अशी टीका मोदींवर होत आहे.