‘भाजप नेत्यांना एवढी कसली मस्ती चढली आहे?’ धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. यात अनेक नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

बीडमध्ये आयोजित एका प्रचारसभेत धनंजय मुंडेंनी ‘भाजपाच्या नेत्यांना कसली एवढी मस्ती चढली आहे? आपल्या मतदारांनाच म्हणतात की तुमच्या ६०० -७०० मतांनी आम्हाला काही फरक पडत नाही असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझी लढाई कोणा एका व्यक्ती विरोधात नाही पण या अहंकाराविरोधात आहे,’ असं विधान केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी केलेल्या या टीकेला पंकजा मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

दरम्यान, बीडमध्ये भाजपतर्फे प्रितम मुंडे तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे मैदानात आहेत. दोनीही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे.