पाच वर्षात एकच प्रेस, त्यातही उत्तर दिले नाही; गिनीज बुकने मोदींची नोंद घ्यावी – मुंडे

dhananjay munde and narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेत संबोधित केले आहे. विशेष म्हणजे मोदी यांनी मागील पाच वर्षात घेतलेली ही पहिलीच पत्रकार परिषद आहे. पहिलीच पत्रकार परिषद असताना देखील मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटकरत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ५ वर्षे तोंडात मूग गिळून बसलेल्या पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले. विशेष म्हणजे पत्रकारांच्या एकही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या शौर्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! गिनीज बुक रेकॉर्ड वाल्यांनी आवर्जून नोंद घ्यावी. असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

Loading...

मोदी आले पत्रकार परिषदेत बसले, नेहमीप्रमाणे भाषण दिलं आणि गेले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला हजेरी लावली. राजधानी दिल्लीत भाजपच्या पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह नरेंद्र मोदीही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पाच वर्षातील कार्याचा आढावा घेतला. जनतेने मन बनवलं आहे, पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येणार असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. तर या पत्रकार परिषदेत जगाला प्रभावित करता येईल अशा अनेक गोष्टी भारतात असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. देशात पुन्हा पूर्ण बहुमत सरकार येणार असल्याचा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला आहे. मात्र पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या एकाही पश्नाला उत्तर दिले नाही.

पश्चिम बंगाल मध्ये माझे ८० कार्यकर्ते मारले, मग तुम्हीच सांगा हिंसाचार कोण करतंय

पश्चिम बंगाल मध्ये माझे ८० कार्यकर्ते मारले गेले आहेत. त्यामुळे तुम्हीच आता समजून घ्या हिंसा कोण पसरवत आहे. आम्ही इतर राज्यात देखील निवडणूक लढवत आहोत पण तिथे हिंसाचार होताना दिसत नाही फक्त पश्चिम बंगाल मध्येच हिंसाचार होत आहे. असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या हिंसाचारावर भाष्य केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत