मारा-तोडा-दंगली घडवा, वाह ! क्या सोच हैं… , धनंजय मुंडेंचा मोदींना टोला

dhanajay munde image

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुप्रतिक्षित असा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मार्च महिन्यात या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता. बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास या बायोपिक दाखवण्यात आला आहे.

याची झलक दोन्ही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. विवेक ओबेरॉयसह बोमन इराणी, इरीना बहाव,  बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. मात्र या ट्रेलरमधील ‘मोदी इन्सान नहीं सोच है’ या डायलॉगवरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या ट्रेलरमधला एक डायलॉग ‘मोदी इन्सान नहीं सोच है’ वाह! क्या सोच हैं… मारा-तोडा-दंगली घडवा. जातीपातीचे,धर्माचे राजकारण करा. आणि मोदींचा अभिनय करणाऱ्याच्या विचारांबाबत तर बोलूच नका. त्याने कालपरवाच स्वतःच्या अ’विवेकी’ बुद्धीचा चांगलाच उद्धार केलाय… अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी मोदींवर घणाघात केला आहे.