सरकारला लाज वाटली पाहिजे – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांचे पंचनामे करताना सरकारला लाज वाटली पाहिजे , शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटया लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का? असा शब्दात शब्दात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘१७ जिल्हयांचा दौरा केला, एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. गारपीटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. धर्मा पाटील यांना मृत्यू नंतरही न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरु आहेत. शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का? गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. शासनाचे अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते?’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या वेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला 20 मिनिटे आणि नंतर दिवासभारासाठी तहकुब करण्यात आले.

पहा काय म्हणाले धनंजय मुंडे