fbpx

…म्हणून क्षीरसागरांनी निकाला आधीचं शिवसेनेत प्रवेश केला – धनंजय मुंडे

munde vs jaydatta kshirsagar

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीचा निकाला आवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला आहे. बीडच्या लोकसभा निवडणुकीत लागणाऱ्या निकालातील महाआघाडीची लीड पाहून क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त निवडला अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी अगोदरच पक्षप्रवेश करायला पाहिजे होता.लोकसभा निवडणुकीतच त्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे आता हा प्रवेश औपचारिकता आहे. उद्या लोकसभेचा निकाल लागणार आहे. आणि सर्वात जास्त लीड बीड विधानसभा मतदार संघातून महाआघाडीच्या उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा निकाल जर शिवसेना-भाजपने पहिला असता तर त्यांना कुणीच प्रवेश दिला नसता. यामुळेच क्षीरसागर यांनी आजचा मुहूर्त निवडला, असेही त्यांनी म्हंटले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्वाचे नेते असणारे जयदत्त क्षीरसागर हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. बीड जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून होणारे कुरघोडीचे राजकारण, तसेच क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला होता.