fbpx

बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही, धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

dhananjay munde and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा: ज्यांचे दोनही खासदार आले नाहीत, ते पंतप्रधान पदाची स्वप्न बघत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला जोरदार उत्तर देत बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही, म्हणत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

कधीकाळी भाजपचे देखील दोनच खासदार सभागृहात होते हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. पाच राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्या पराभवामुळेच भाजपचा आत्मविश्वास गमावला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे विधान केले ते आत्मविश्वास गमावल्यामुळे असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे.

सत्ता ही मायबाप जनता देत असते. देशातील जनतेच्या कृपेने आज भाजपचे बहुमत आहे. मात्र पुन्हा तुमची संख्या दोनवर येऊ शकते असे तुम्ही काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि गर्वात राहू नये. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ४२ च्या ४३ जागा करू असे मुख्यमंत्री म्हणाले पण भाजपची परिस्थिती इतकी भयंकर आहे की भाजपला दहा ही जागा मिळणार नाहीत. असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.