ते माधुरीकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ – धनंजय मुंडे

पुणे: केंद्र सरकारच्या जाहिरातीमध्ये देश बदल रहा है, असे सांगितले जाते. देश बदलतो का नाही हे माहित नाही. पण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय होतोय. असा हल्ला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केला आहे.काँग्रेसकडून आज पुण्यामध्ये हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानावर हल्ला चढवला. ते माधुरीकडे गेलेत आपण मजुराकडे जाऊ आणि भाजपची निष्क्रियता दाखवून देऊ. असे मुंडे म्हणाले. तसेच पाया खालची माती सरकल्यानेच अमित शहा मातोश्रीवर गेले. भाजपला छत्रपतींचा राज्याभिषेक आठवत नाही मात्र सेलिब्रिटीना भेटता येते. धनगर आरक्षण देता येत नाही म्हणून सोलापूरच्या विद्यापीठाला नाव देयच पुढं केलं जातं. इंदूरच्या विद्यापीठाला आधीच अहिल्यादेवीच नाव दिल्याने ते सोलापूर विद्यापीठला देता येणार नाही ही फसवणूक आहे. असे मुंडे म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेस आज आपला २० वा वर्धापन दिवस देखील साजरा करत असल्याने आजच्या सभेला विशेष महत्व आहे. जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत. पवार घराण्यातील तिसरी पिढी म्हणजेच राजेंद्र पवार यांचे पुत्र आणि पुणे जिल्हापरिषद सदस्य असणारे रोहित पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या सभेच्या नियोजनावर स्वतः लक्ष ठेवत आहेत. तसेच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये बसून आपणही नेते नाही तर पक्षाचे कार्यकर्तेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सहकारनगर भागात असणाऱ्या शिंदे हायस्कूलच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सांगता सभा असल्याच सांगितले जात आहे, विशेष म्हणजे जेलमधून सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच जेष्ठ नेते छगन भुजबळ हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.