fbpx

गेंड्याच्या कातडीचे सरकार चाबकाने वठणीवर येणार नाही- धनंजय मुंडे

Dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा- दिलीप बनकर यांनी या सरकारला वठणीवर आणण्यासाठी चाबूक दिला, पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या चाबकाचा यांच्यावर काही परिणाम होणार नाही अशा शब्दात निफाड येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. आपण गायी म्हशींना मका चारायचो. पण आज पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपल्यालाच मका खाऊ घालत आहेत. कॅशलेस भारताचे स्वप्न पाहणाऱ्या मोदिजींनी निफाडच्या बैल बाजारात यावे आणि कॅशलेस पद्धतीने बैलजोडी विकत घेऊन दाखवावी असं आव्हान देखील मुंडे यांनी मोदींना दिलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे 

मोदींच्या कृपेने विजय मल्य्या , नीरव मोदी , ललित मोदी हजारो कोटी रुपयांना देशाला बुडवीत आहेत. आणखी हि काही बुडवे पुढे येतील. त्यामुळे पंतप्रधान तुमच्या खात्यावर 15 लाख रु तुमच्या खात्यावर टाकतील हे आता विसरा ,तुमच्याच नावावर 15 लाखाचे कर्ज करून जातील हे लक्षात ठेवा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अहमदनगरच्या उपमहापौरांनी अपशब्द वापरले. पण मुख्यमंत्री यावर काहीही बोलत नाहीत. हे राज्य कुठे चालले आहे? भाजप सांगते की त्याचा राजीनामा घेतला. पण महापौर म्हणतात, अजून राजीनामा घेतला नाही. अशी फसवणूक का?

शिवसेना सध्या दुटप्पी राजकारण करत आहे. हिंदुहृदयसम्राट यांची शिवसेना लाचार झाली आहे. ते आता कशालाही भितात. ही शिवसेना नव्हे, भीवसेना आहे. शिवसेनेने पाट्यांवरील वाघ काढून टाकावा व त्याजागी ससा लावावा.

१५ लाख खात्यात जमा होण्याचा विचारही डोक्यातून काढून टाका. कारण देशावरच भरमसाठ कर्ज झाले आहे.

हल्लाबोल यात्रेच्या निफाड येथील सभेत संयोजकांनी जनविरोधी सरकारला वटणीवर आणण्यासाठी चाबूक भेट दिला तर काही शेतक-यांनी आपल्या उघड्या अंगावर आपल्या व्यथा लिहून निवेदन दिले.