हा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय ! – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले. राजीनामा देत असतान येडीयुरप्पा यांनी भावनिक भाषण करत कर्नाटकच्या जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आता भाजपवर यामुळे सगळीकडून टीका होत आहे. यामध्येच १०० कोटी रुपये हरले, १०० कोटी जनता जिंकली ! धनशक्तीवर जनशक्तीचा विजय ! झाला असल्याच मत राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल आहे.

bagdure

You might also like
Comments
Loading...