fbpx

विचाराची लढाई विचारांनी लढा, नीच राजकारण करू नका – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून सरकार नीच राजकारण करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचाराची लढाई विचारांनी लढावी, सत्याशी प्रामाणिक राहणाऱ्यांची मुस्कटदाबी करू नये. असं नीच राजकारण करू नका, अशी टीकाही मुंडे यांनी केली आहे. शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते.

सरकारने लोकांचं जगणं मुश्कील केलं आहे. महाराष्ट्रातलं अख्खं गावच विक्रीला काढल्याची बातमी मध्यंतरी ऐकली होती. शेतकऱ्यांच्या आयुष्यात विष कालवण्याचे काम सरकारने केले. असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आयाराम गयाराम अशा बातम्या रोज झळकत आहेत. ज्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांनाच भाजपा जवळ करत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला होता पण आता सरकार भ्रष्टाचारी आहे, अशी टीका मुंडे यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या