#ValentinesDay : यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का ? धनंजय मुंडेंच्या भाजप-सेनेला हटके शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेत असले तरी देखील दोघांमधील सख्य संपूर्ण राज्याने गेल्या ४ वर्षात पाहिलं आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकीकडे शिवसेनेन स्वबळाचा नारा दिला असला तरी युतीच्या चर्चा मात्र सुरु आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे ‘तुझे माझे जमेना , तुझ्या वाचून करमेना’ असचं असल्याची टीका विरोधक सातत्याने करत असतात. आज व्हेलेन्टाईन डे चे औचित्य साधून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी याच मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेला उपहासात्मक टोला लगावला आहे.

ट्विटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक फोटो पोस्ट करत धनंजय मुंडे यांनी “यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का ? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का ?” अस ट्विट केलं आहे. त्यामुळे मुंडेंच हे ट्विट उभय पक्षांतील नेत्यांच्या जिव्हारी नाही लागल तर नवलचं…

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील