भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा:-राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.

शिवस्वराज्य यात्रा ही माजलगाव मध्ये आली असता धनंजय मुंडे यांनी सभेला संबोधित करताना ‘भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती आहे. त्यांच्या सभास्थानी डी सर्कलमध्ये सर्वसामान्यांना परवानगी नाही अशी टीका भाजप सरकारवर केली आहे. तसेच पुढे बोलताना ‘आपल्या यात्रेला लोकांचं इतकं प्रेम मिळतंय, इतका प्रचंड प्रतिसाद आहे की जागेच्या अभावी लोकांना डी सर्कलमध्ये बसावे लागत आहे. आपल्या मावळ्यांना कुणाचीही भीती नाही’ असं विधान केले आहे.

Loading...

दरम्यान पुढे बोलताना मुंडे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला विरोध होत आहे. कर्जमाफीची खोटी कागदपत्रे तोंडावर भिरकावली जात आहे. यात्रेला गर्दी जमवण्यासाठी शाळेची मुलं बोलवली जात आहे. विरोधी पक्षात दबाव निर्माण करण्यासाठी यात्रा जाईल तिथे आमच्या कार्यकर्त्यांना गायब केले जात आहे. असे वक्तव्य त्यांनी यावेळी केल.याच वेळी  बोलतांना त्यांनी आज माजलगावमध्ये काडीचा विकास झालेला नाही. आदरणीय प्रकाशदादांनी केलेल्या विकासावर पाणी फेरत इथल्या सत्ताधाऱ्यांनी माजलगावाला १० वर्षे मागे नवीन ठेवले आहे असे विधान पण केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले