महाराष्ट्राची राज्य भाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानी करून टाका : धनंजय मुंडे

dhananjay munde beed

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही गुजराती वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे सरकारचा महाराष्ट्राचे संपूर्ण गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा निषेधार्ह प्रकार असल्याची संतप्त टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरुन महाराष्ट्रातील शिक्षकांना धडे देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. इयत्ता पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम नुकताच बदलण्यात आला आहे. या अभ्याक्रमासाठी संबंधित विषयांच्या शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दुरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून वंदे गुजरात या वाहिनीची निवड केली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

Loading...

सरकारला गुजरातीचे इतकेच प्रेम असेल तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका, असा टोलाही मुंडे यांनी लगावला आहे. तसेच सरकारच्या या गुजराती आणि जिओ प्रेमाचा धिक्कार असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

छत्रपतींची उंची कमी कराल तर याद राखा- धनंजय मुंडे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी