गणपती बप्पा या सरकारला सुबुद्धी दे रे ! – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : देशातील नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीपासून अजूनही दिलासा मिळताना दिसत नाही. परंतु, कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारने राज्यातील जनतेला अल्पसा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रूपये प्रति लिटरची कपात केली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.

दरम्यान, कर्नाटकमधील सरकारने इंधनाचे दर कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार इंधनाचे दर कधी कमी करणार असा सवाल मुंडे यांनी ट्विटवरून केला आहे. , ‘राजस्थान, आंध्रप्रदेश पाठोपाठ शेजारच्या कर्नाटक राज्यानेही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार असा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेला कधी दिलासा देणार आहे. गणपती बप्पा सरकारला असा निर्णय घेण्याची सुबुद्धी दे रे!’ या आशयाचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे तर या ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅगही केले आहे.

धनंजय मुंडेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे – सुरेश धस

You might also like
Comments
Loading...