पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

0Dhananjay_Munde_0

नागपूर : राज्यकर्त्यांनी नागपूरला अधिवेशन घेण्याआधी शेतकरी हिताचे, नागपूर आणि विदर्भाचे असते तर आम्ही सरकारचे अभिनंदन केले असते. मात्र सर्व विषय बाकी असताना पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला घेण्यामागचे कारण काय, म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, पण मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याने, आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं यावेळी मुंडे यांनी सांगितले.पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील ज्वलंत समस्या आणि सरकारविरोधातील रणनितीवर चर्चा करण्यात आली. उद्यापासून नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांनी पत्रकार परिषद घेवून सरकारवर हल्लाबोल केला.

हा तर धनंजयवर अन्याय! शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली…ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं मंगळसूत्र शिवसेनेनं बांधावे असा खोचक सल्ला विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेतील का प्रमुख मुद्दे –

  • राज्य सरकारने अफवा पसरवणे बंद करावे, नुसत्या घोषणा काम काही नाही?? धुळे घटनेतील पीडित कुटुंबाला 10 लाख रुपये द्यावे.-राधाकृष्ण विखे पाटील
  • राज्यात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत -विखे पाटील
  • सरकार केवळ अफवा पसरवत आहे. चांदयापासून बांदयापर्यंत जनतेमध्ये नाराजी : राधाकृष्ण विखे पाटील
  • मुंबईचा डीपी प्लॅन जनतेसाठी डिझास्टर प्लॅन : राधाकृष्ण विखे पाटील
  • पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूर घेण्यामागचे कारण काय ? : धनंजय मुंडे
  • शेतकऱ्यांचे जीवनमान या सरकारने उध्वस्त केले. : धनंजय मुंडे

युतीच्या उमेदवारांना विजयी कर, पंकजा मुंडे तुळजा भवानी मातेच्या चरणी

‘तो’ आरोपी माझा सुरक्षारक्षक नाही; निलंगेकरांचा खुलासा