शिवस्मारकतील घोटाळा बाहेर काढल्याने विनायक मेटेंना मंत्रीपद दिले नाही का? – धनंजय मुंडे

Vinayak Mete

टीम महाराष्ट्र देशा : रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. विनायक मेटे यांनी शिवस्मारकमधील घोटाळा बाहेर काढल्याने त्यांना मंत्रीमंडळातून वगळले का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवेनेकडून जयदत्त क्षीरसागर, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या जागी आशिष शेलार यांची वर्णी लागली. दरम्यान या मंत्रीमंडळात विनायक मेटे यांची वर्णी न लागल्याने धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Loading...

जयदत्त क्षीरसागर यांना सेनेचे मंत्रीपद दिले पण विनायक मेटे यांना मंत्रीपद का दिले नाही? त्यांनी शिवस्मारकमधील घोटाळा बाहेर काढल्याने त्यांना ही शिक्षा दिली काय? असा सवाल मुंडे यांनी केला. इतकेच नव्हे तर, ६ मंत्र्यांना ज्या कारणावरून मंत्रीपादावरून वगळले त्यात इतर १६ मंत्र्यांना कधी काढणार? असा सवालही मुंडे यांनी केला.

याचबरोबर, शिक्षण विभागाचा विनोद झाला, त्यात ‘भगवान बचाय शेलार को’ असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि त्याचे आरोप आहेत, ज्यावर चौकशी स्वीकारली त्याचे काय झाले’? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला